द 'स्मोकिंग' ट्रेन, धावत्या लोकलमधून धूर आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 22:11 IST2018-09-20T22:10:46+5:302018-09-20T22:11:27+5:30
हार्बर मार्गावरील 8 वाजून 2 मिनिटांच्या बेलापूर -सीएसएमटी लोकलमधून अचानक धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

द 'स्मोकिंग' ट्रेन, धावत्या लोकलमधून धूर आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
महेश चेमटे
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशानी गुरुवारी सायंकाळी द स्मोकिंग ट्रेनचा थरार अनुभवला. हार्बरवरील बेलापूर-सीएसएमटी लोकल मधून धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. धुराच्या कारणामुळे दोन वेळा लोकल थांबवली मात्र धुराचे कारण स्पष्ट न झाल्याने लोकल सीएसएमटीकडे रवाना करण्यात आली.
हार्बर मार्गावरील 8 वाजून 2 मिनिटांच्या बेलापूर -सीएसएमटी लोकलमधून अचानक धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. मोटारमन केबिनच्या तिसऱ्या बोगी खालून धूर येत असल्याने लोकल वाशी स्थानकात थांबवण्यात आली. जुईनगर स्थानक ओलांडताच धावत्या लोकलच्या खालून धूर येऊ लागला. दरम्यान, अखेर कोणताही बिघाड नसल्याचे सांगत लोकल सीएसएमटीकडे रवाना करण्यात आली. तथापि लोकल खालून धूर का येत होता ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पाहा व्हिडीओ -