वांदे्र रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टी खाक; अतिक्रमणे हटवताना लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 06:55 IST2017-10-27T06:54:13+5:302017-10-27T06:55:16+5:30
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगरमधील अनधिकृत झोपड्यांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू असतानाच गुरुवारी लागलेल्या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या.

वांदे्र रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टी खाक; अतिक्रमणे हटवताना लागली आग
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगरमधील अनधिकृत झोपड्यांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू असतानाच गुरुवारी लागलेल्या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या. त्यात अरविंद घाडगे या अग्निशमन दलाच्या जवानासह दोघे जखमी झाले. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रेल्वे तिकीटघराजवळ ही आग लागल्याने वांद्रे-अंधेरी हार्बर वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. दुपारी साडेतीन वाजता काही झोपड्यांनी पेट घेतला आणि शेकडो झोपड्यांना कवेत घेतले. लगेच १६ फायर इंजीन, १२ जम्बो वॉटर टँकर, २ जेसीबी पाठविण्यात आले. शिवाय तत्काळ मदतकार्यही हाती घेण्यात आले. मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे आग शमविण्यात अडथळे येत होते. तिकीटघरालगतच्या पुलालाही आगीची झळ बसल्याने स्कायवॉकसह पूल, तिकीटघर बंद करण्यात आले होते. सायंकाळी साडेसहानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. साडेसात वाजता ती विझवली, असे अग्निशमन दलप्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली.
>हार्बर वाहतूक काही काळ बंद
मध्य रेल्वेतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून हार्बर मार्गावरील वाहतूक दुपारी ४.२५ ते ४.५० या काळात वाहतूक बंद करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल
फेºया सुरू होत्या. आगीत तिकीटघराचेही नुकसान झाले. या वस्त्या रेल्वेच्या जागेवर आहेत. अनेक झोपड़्या तब्बल चार ते मजली असून, त्यांना याआधीही आगी लागल्या आहेत.
कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने किमान २४ तास आधी नोटीस द्यायला हवी होती, असे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक हाजी अलीम म्हणाले.