अंधेरी रेल्वे स्थानकात आता स्लीपिंग पॉड; प्रवाशांना आधुनिक सुविधा, पाच हजार चौरस फुटांवर लवकरच उभारणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:19 IST2026-03-18T14:19:26+5:302026-03-18T14:19:38+5:30

महेश कोले - मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकात पूर्वेला स्लीपिंग पॉड (पॉड ...

Sleeping pods now available at Andheri railway station; Modern facilities for passengers, to be set up soon on 5000 square feet | अंधेरी रेल्वे स्थानकात आता स्लीपिंग पॉड; प्रवाशांना आधुनिक सुविधा, पाच हजार चौरस फुटांवर लवकरच उभारणी 

अंधेरी रेल्वे स्थानकात आता स्लीपिंग पॉड; प्रवाशांना आधुनिक सुविधा, पाच हजार चौरस फुटांवर लवकरच उभारणी 

महेश कोले -

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकात पूर्वेला स्लीपिंग पॉड (पॉड हॉटेल) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर पाच हजार चौरस फूट क्षेत्र या प्रकल्पासाठी निश्चित केले आहे. त्यासोबतच आवश्यक युटिलिटीज उभारण्यासाठी लागूनच सुमारे ५०० ते ६०० चौरस फूट अतिरिक्त जागाही प्रस्तावित केली आहे. 

अंधेरी हे पश्चिम उपनगरांतील एक प्रमुख वाहतूक केंद्र असून, दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. गोरेगावमधील नेस्को सेंटर आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने, व्यावसायिक मेळावे, विविध कार्यक्रम होतात.

या कार्यक्रमांना मुंबईसह राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने येतात. अनेकदा कार्यक्रम सलग दोन ते तीन दिवस चालतात. अशा काळात अंधेरी, गोरेगाव, बोरीवली आणि आसपासच्या भागातील हॉटेल्स व विश्रामगृहे पूर्णपणे भरलेली असतात. 

परिणामी, प्रवाशांना परवडणाऱ्या दरांत आणि जवळच्या परिसरात राहण्याची सुविधा मिळणे कठीण होते. त्यामुळे या भागात पॉड हॉटेल उभारण्याची मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती.

मुंबई सेंट्रल येथील सुविधा ९५ टक्के फुल्ल
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील पॉड हॉटेलला प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे हॉटेल बहुतांश वेळा सुमारे ९५ टक्के क्षमतेने भरलेले असते.याच अनुभवाच्या आधारे अंधेरीत अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

चार्जिंग स्टेशन, प्रकाशयोजना, एसी सद्य:स्थितीत अंधेरी स्थानकात मोठा डेक उपलब्ध असून, पीआरएस कार्यालयाजवळील मोकळी जागा या प्रकल्पासाठी योग्य मानली जात आहे.  स्लीपिंग पॉड तेथे उभारण्यात येणार असून, प्रवाशांना अल्प कालावधीसाठी आरामदायी आणि सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध होईल. 
या पॉडमध्ये बेड, चार्जिंग पॉइंट्स, प्रकाशयोजना, एसी, तसेच आवश्यक गोपनीयता यांसारख्या सुविधा दिल्या जाण्याची शक्यता आहे. 

Web Title : अंधेरी स्टेशन पर स्लीपिंग पॉड्स: यात्रियों के लिए आधुनिक सुविधाएं

Web Summary : पश्चिम रेलवे अंधेरी स्टेशन पर स्लीपिंग पॉड्स बनाएगा। मुंबई सेंट्रल की सफलता से प्रेरित होकर, 5,000 वर्ग फुट की सुविधा में बेड, चार्जिंग, एसी और गोपनीयता के साथ अल्पकालिक आवास मिलेगा। गोरेगांव के पास कार्यक्रम में आने वाले यात्रियों के लिए आदर्श।

Web Title : Sleeping Pods Coming to Andheri Station: Modern Amenities for Passengers

Web Summary : Western Railway will build sleeping pods at Andheri station due to high demand. Inspired by Mumbai Central's success, the 5,000 sq ft facility offers affordable, short-term accommodation with beds, charging, AC, and privacy. Ideal for travelers attending events near Goregaon.

टॅग्स :Mumbaiमुंबई