Join us

CoronaVirus ६0 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 07:04 IST

एकूण २८ हजार इमारतींच्या आवारांमध्ये निर्जंतुकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शुक्रवारी निदान झालेल्या १३२ रुग्णांपैकी ६० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सहवासितांचा शोध या कार्यवाहीमुळे दिसून येत आहेत. शुक्रवारी नोंद झालेल्या १० मृतांपैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत कोरोना (कोविड-१९)च्या १६ हजार चाचण्याझाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारपर्यंत २८ हजार २४३ इमारतींच्या आवारांमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार निर्जंतुकीकरण करÞण्यात आले आहे.सहवासितांचा शोधातून ३८२ रुग्णांची नोंदमुंबईत शुक्रवारपर्यंत ७७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अतिजोखमीच्या ४ हजार २८ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. त्यातून ३८२ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यातील बहुतेक रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत, आणि त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.४४२ संशयितांचे नमुनेमुंबईतील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित रुग्ण कोरोना (कोविड-१९) रुग्ण शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करÞण्यात आले आहे. ०५ ते ०९ एप्रिलप्रयंत ५० क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत. त्यात १ हजार ९०६ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यांपैकी ४४२ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस