सहा वर्षांच्या मुलीवर बसमध्ये अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:24 IST2018-06-16T06:24:39+5:302018-06-16T06:24:39+5:30

खासगी बसमधून आई-वडिलांसोबत मुंबईकडे निघालेल्या ६ वर्षांच्या मुलीवर चालत्या बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मालाडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने बेस्ट डेपोमध्ये कार्यरत असलेला चालक सोपान उगले (३२) याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

 A six-year-old girl tortured at the bus | सहा वर्षांच्या मुलीवर बसमध्ये अत्याचार

सहा वर्षांच्या मुलीवर बसमध्ये अत्याचार

मुंबई -  खासगी बसमधून आई-वडिलांसोबत मुंबईकडे निघालेल्या ६ वर्षांच्या मुलीवर चालत्या बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मालाडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने बेस्ट डेपोमध्ये कार्यरत असलेला चालक सोपान उगले (३२) याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे.
शिर्डीवरून मुंबईत येत असताना १३ जून रोजी हा प्रकार घडला. या बसमध्ये संगमनेरवरून परतणारा उगले रात्री साडेदहाच्या सुमारास चढला. तो मागच्या सीटवर बसला. आई-वडिलांशेजारी बसलेल्या नेहाची (नावात बदल) सीट खराब असल्याने तिला व्यवस्थित बसता येत नव्हते. रात्री तीनच्या सुमारास आईने तिला उगलेच्या शेजारील रिकाम्या सीटवर बसवले. सकाळी नेहा घरी पोहोचली. घरी आल्यावर ती घाबरलेली दिसली. याबाबत आईने तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा उगलेने रात्री तिच्या सोबत अश्लील चाळे केल्याचे सांगितले. या प्रकारामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी बस स्टॅन्डवर जाऊन बसचा शोध घेतला. त्यांना ती बस सापडली, मात्र उगले तेथे नव्हता. त्यांनी कुरार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या कक्ष १२ने संबंधित ट्रॅव्हल एजन्सीमधून उगलेची माहिती मिळवली. तो गोरेगाव बस डेपोमध्ये कार्यरत असल्याचे समजले. त्याच्या मोबाइल क्रमांकावरून त्याचे लोकेशन गोरेगाव असल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार गुरुवारी त्याला बेड्या ठोकल्या.

Web Title:  A six-year-old girl tortured at the bus