ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:07 IST2017-11-17T02:07:46+5:302017-11-17T02:07:57+5:30

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा जुहू पोलिसांनी पदार्फाश केला. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

 Six people arrested for trying to rob a jeweler are arrested | ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना अटक

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना अटक

मुंबई : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा जुहू पोलिसांनी पदार्फाश केला. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
झेव्हियर दयाळ, राज साखरे, मोहन देवेंद्र, कृष्णा देवेंद्र, मनीष देवेंद्र आणि जुम्मन शेख अशी अटक संशयित आरोपींची नावे आहेत. विलेपार्लेच्या दीपिका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र याबाबत पोलिसांना ‘टीप’ मिळाली आणि त्यांनी भगवती नानक पूर्व प्राथमिक शाळेच्या मैदानातून या सर्वांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या चौकशीत विलेपार्ले परिसरातील तीन घरफोड्या त्यांनी उघड केल्या. तसेच खारमध्येही एका घरफोडीत त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

Web Title:  Six people arrested for trying to rob a jeweler are arrested