साहेब, अर्ज केल्यानंतर किती दिवसांत मिळते जातप्रमाणपत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:39 AM2023-12-19T10:39:06+5:302023-12-19T10:39:14+5:30

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जातप्रमाणपत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वर्षभरात सर्व विभाग मिळून २ हजार प्रमाणपत्र वाटप झाले आहेत.

Sir, how many days after applying caste certificate will get | साहेब, अर्ज केल्यानंतर किती दिवसांत मिळते जातप्रमाणपत्र?

साहेब, अर्ज केल्यानंतर किती दिवसांत मिळते जातप्रमाणपत्र?

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : वर्षभरात उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभागाकडून मुंबईत जातप्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. ‘सेतू’मध्ये अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत हे प्रमाणपत्र मिळते. त्याचा फायदा अर्जदारांना होत आहे.

गतवर्षी २ हजार प्रमाणपत्रांचे वाटप
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जातप्रमाणपत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वर्षभरात सर्व विभाग मिळून २ हजार प्रमाणपत्र वाटप झाले आहेत.

सात महिन्यांत ३ हजार जातप्रमाणपत्रांचे वाटप 
 शैक्षणिक संस्था प्रवेश, नोकरी अर्ज, तसेच शिष्यवृत्तीसाठी जातप्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे गेल्या सात महिन्यांत ३ हजार प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे.
 दिवाळीनंतर जातीचे प्रमाणपत्र अर्जांची संख्या जास्त असते. तसेच शैक्षणिक वर्षासाठी पुढील पाच महिन्यांत दोन ते तीन हजार जातप्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

४५ दिवसांत मिळते प्रमाणपत्र
अर्ज केल्यानंतर २५ ते ४५ दिवसांत अर्ज निकाली काढण्याची तरतूद आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ते महत्त्वाचे असते. मोठ्या प्रमाणात अर्ज येत असून ५ ते १० अर्ज निकाली काढले जातात.

कोणती कागदपत्रे आवश्यक?
जातप्रमाणपत्रासाठी शासनाने कडक अटी घातल्या आहेत. त्यामध्ये १९५० आणि १९५५ पूर्वीचे पुरावे जात सिद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत दाखला, रहिवासी दाखला असे सह पुरावे सादर करावे लागतात.

Web Title: Sir, how many days after applying caste certificate will get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.