साध्या कपड्यातील पोलिसांनी केले महिलेशी गैरवर्तन ?

By Admin | Updated: November 16, 2016 04:56 IST2016-11-16T04:56:40+5:302016-11-16T04:56:40+5:30

रात्रीच्या वेळी घरी परतत असताना दोन साध्या वेशातील पोलिसांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तब्बल ३३ टिष्ट्वट विले पार्ले येथील

Simple clothes police abused women? | साध्या कपड्यातील पोलिसांनी केले महिलेशी गैरवर्तन ?

साध्या कपड्यातील पोलिसांनी केले महिलेशी गैरवर्तन ?

मुंबई : रात्रीच्या वेळी घरी परतत असताना दोन साध्या वेशातील पोलिसांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तब्बल ३३ टिष्ट्वट विले पार्ले येथील महिलेने केल्याने मंगळवारी पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले.
विलेपार्ल्यात राहणारी गीजी काटर्शिया ही महिला सोमवारी रात्री
३ वाजण्याच्या सुमारास रिक्षाने घरी परतत होती. ती इमारतीजवळ उतरल्यानंतर पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी तिला हटकले. त्यानंतर या दोघांनीही आपला हात पकडून अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली. महिलेने या दोघांनाही त्यांच्या ओळखीबाबत विचारणा केली असता, आम्ही पोलीस आहोत, असे या दोघांनी सांगितले. घरी गेल्यानंतर पहाटे ४ वाजल्यापासून मुंबई पोलिसांच्या व्टिटर अकाउंटवर तब्बल ३३ टिष्ट्वट करून आपल्यासोबत घडलेला निंदनीय प्रकार मांडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Simple clothes police abused women?