Join us

ग्रीन झोन मध्ये एसटी सुरु होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 18:05 IST

५० टक्के प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु होईल; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश आणि संमती आवश्यक

 

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांच्या आधारावर सरकारने तीन झोन तयार केले आहे.  त्यामध्ये रेड,आँरेंज आणि ग्रीन झोन आहे.  यापैकी ३ मेपासून ग्रीन झोन मधील एसटी बस सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रत्येक बस मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमता असणार आहे. मात्र यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश आणि संमती आवश्यकता आहे. 

राज्य सरकारने ३ मेपासून लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.  कोरोना बाधीत रुग्णांच्या आधारावर ठरवण्यात आलेल्या जिल्ह्यापैकी ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये एसटीची शहरांतर्गत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्या एसटीला जिल्ह्यांच्या बाहेर जाण्यास बंदी राहणार आहे. एसटी प्रवाशांना जिल्ह्यातील कामानिमित्त बाहेर पडता येणार असल्याची शक्यता आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. परिणामी, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होत आहे. काही ठिकाणी जादा किंमतीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. ग्रीन झोन मध्ये एसटीची सेवा सुरु केल्यास प्रवाशांना दिलासा  मिळणार  आहे. 

--------------

ग्रीन झोनमध्ये  एसटी बसची सेवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश आणि संमतीने सुरु होतील, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

--------------

राज्यात वर्धा, गडचिरोली, वाशीम, सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, गोंदिया या ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यात एसटीची सेवा सुरु होऊ शकते. 

--------------

रेड झोनमधील जिल्हे

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे,पालघर, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, यवतमाळ, धुळे, अकोला, जळगाव

--------------

आँरेंज झोनमधील जिल्हे

रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, परभणी, सांगली, भंडारा

--------------

ग्रीन झोनमधील जिल्हे

 वर्धा, गडचिरोली, वाशीम, सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, गोंदिया

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या