मुंबईत सिग्नल यंत्रणेला 'बूस्टर'; पालिका प्रशासन करणार ३३ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:14 IST2026-03-24T14:13:29+5:302026-03-24T14:14:04+5:30

पुढील दोन वर्षांसाठी देखभाल यंत्रणेची तयारी

signal system in mumbai to get booster municipal administration to spend Rs 33 crore | मुंबईत सिग्नल यंत्रणेला 'बूस्टर'; पालिका प्रशासन करणार ३३ कोटींचा खर्च

मुंबईत सिग्नल यंत्रणेला 'बूस्टर'; पालिका प्रशासन करणार ३३ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेकडून शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम व आधुनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्देशाने एरिया ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) सिग्नल सिस्टीमच्या आणि नॉन एटीसी रस्त्यांच्या देखभालीसाठी तब्बल ३३ कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पांतर्गत १ जुलै २०२६ ते ३० जून २०२८ या दोन वर्षाच्या कालावधीत सर्व प्रकारची सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यात येणार असून, त्यांची देखभाल करण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेच्या ट्रॅफिक विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व रोड ट्रॅफिक सिग्नल जंक्शनची नियमित प्रतिबंधक आणि दुरुस्ती देखभाल करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यमान वाहन व पादचारी सिग्नलचे अपग्रेडेशन, सिग्नल टाइमिंगमध्ये बदल, तसेच अत्याधुनिक वाहनशोध कॅमेरे बसवणे व त्यांची देखभाल यांचा समावेश आहे.

अपघातामुळे नुकसानीची दुरुस्ती करावी लागणार

नुकसान दुरुस्ती अंतर्गत खराब सिग्नल कंट्रोलर, पोल, केबल्स, कॅमेरे यांची अदलाबदल, ट्रेंचिंग, पाइपलाइन टाकणे आणि नागरी कामांमुळे आवश्यक असलेले सिग्नल शिफ्टिंग यासारखी कामे करण्यात येतील.

तसेच अपघातामुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्तीही कंत्राटदाराला करावी लागेल. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक नियंत्रण अधिक स्मार्ट, जलद आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे मत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

संपूर्ण जबाबदारी कंत्राटदारावर

सर्व सिग्नल जंक्शन 'फुली अॅडॅप्टिव्ह मोड'मध्ये सुरळीतपणे चालू राहतील, याची जबाबदारी कंत्राटदारावर असेल. याशिवाय, नवीन ट्रॅफिक सिग्नल जंक्शनची उभारणी, त्यांची चाचणी (टेस्टिंग) व कार्यान्वयन (कमिशनिंग) देखील या प्रकल्पाचा भाग आहे. सिग्नल पोल, कंट्रोलर, केबल्स, वीजपुरवठा यंत्रणा यांची देखभाल तसेच साफसफाईची कामे नियमितपणे करावी लागणार आहेत.
 

Web Title : मुंबई में सिग्नल प्रणाली को मिलेगा 'बूस्टर': ₹33 करोड़ का निवेश

Web Summary : मुंबई के ट्रैफिक सिग्नल अब आधुनिक होंगे। शहर दो वर्षों में ₹33 करोड़ का निवेश कर ट्रैफिक नियंत्रण प्रणाली को बेहतर बनाएगा। इसमें सिग्नल अपग्रेड करना, कैमरे लगाना और सुचारू यातायात के लिए नुकसान की मरम्मत करना शामिल है।

Web Title : Mumbai to Upgrade Traffic Signals with ₹33 Crore Investment

Web Summary : Mumbai's traffic signals are set for a major upgrade. The city will invest ₹33 crores to modernize and maintain its traffic control systems over two years. This includes upgrading signals, installing cameras, and repairing damage for smoother, smarter traffic flow.