टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:39 AM2024-03-22T11:39:16+5:302024-03-22T11:40:09+5:30

वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला.

Siblings die by drowning in tank Park Supervisor Arrested Plastic was thrown on the open tank | टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक!

टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक!

मुंबई :

माटुंग्यातील महर्षी कर्वे रोड येथील पालिकेच्या वन गार्डनमधील पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी माटुंगा पोलिसांनी कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरला अटक केली आहे. पतीराम विक्रम यादव असे त्याचे नाव आहे.

वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. खेळताना पाण्याच्या टाकीत बाटलीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडल्याचे सीसीटीव्हीतून दिसून आले. आरएके मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू करण्यात आला. मंगळवारी हा गुन्हा पुढील तपासासाठी माटुंगा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. वन गार्डनमध्ये खूप जुनी जमिनीत पाण्याची मोठी टाकी असून त्या टाकीची झाकणे उघडी होती, त्याच्यावर काळ्या रंगाचे प्लास्टिक टाकण्यात आले होते. पाण्याच्या टाकीवर झाकणे नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला. त्यानुसार, अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात पालिकेच्या उद्यान विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी कलमात वाढ करण्यात आली आहे. 

पालिकेने माटुंगा पोलिसांना दिलेल्या माहितीत कंत्राटदारावर कंपनीवर खापर फोडले. त्यानुसार, पोलिसांनी कंत्राटदारविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. चौकशीत पालिकेने हिरावती एंटरप्रायझेसला काम दिले होते. हिरावतीकडून पतीराम विक्रम यादवची सुपरवायझर म्हणून नियुक्ती केल्याचे समोर आले. त्यानुसार यादवला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखीन कुणाचा सहभाग आहे का? या दृष्टीने पोलिस अधिक तपास करत आहे.

Web Title: Siblings die by drowning in tank Park Supervisor Arrested Plastic was thrown on the open tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.