Join us  

श्रावण सरी ५० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 6:48 PM

गुरुवारी सकाळच्या आठच्या नोंदीनुसार, बुधवारी रात्री मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे.

मुंबई : गुरुवारी सकाळच्या आठच्या नोंदीनुसार, बुधवारी रात्री मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. सांताक्रूझ, वांद्रे, महालक्ष्मी आणि राम मंदिर येथे ब-यापैकी पावसाची नोंद झाली असून, ठाणे आणि नवी मुंबईत देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. १८ जुलैपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गुरुवारी सकाळी कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही वेधशाळेत पावसाची ब-यापैकी नोंद झाली आहे. या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याकडील माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक येथील हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून लगतच्या परिसरात पाऊस कोसळत आहे. मुंबईत झालेला पाऊसदेखील याचाच एक भाग आहे. पुढच्या काही तासांसाठी मुंबई आणि उपनगरात पाऊस अशाच रितीने कोसळत राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २५ आणि २६ जुलैच्या आसपास पावसाचे प्रमाण वाढेल. याच काळात मुंबईचे वातावरण आल्हादायक होईल. बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास बोरीवली पश्चिम येथील आर्यभट्ट रोड येथील नाल्यात एक व्यक्ती पडला. त्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. सिरोज नशीर शेख असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, मुंबईत सकाळी, दुपारी आणि सायंकाळी पावसाने विश्रांतीच घेतली. कुठे तरी पडलेली तुरळक सर वगळता मुंबई तशी कोरडीच होती. मात्र गुरुवारी दिवसभर मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले होते. प्रत्यक्षात मात दिवसभर पाऊस बेपत्ताच होता.   .....................कुठे पडला किती पाऊससांताकूझ ४९विद्याविहार ४५.८०चेंबूर ३४.६०राम मंदिर ३३दादर ३३.२०वरळी ३२.८०वांद्रे २४महालक्ष्मी १४

 

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेट