मॅकडोनाल्डला कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:04 AM2019-11-26T04:04:40+5:302019-11-26T04:05:02+5:30

चुकीची जाहिरात करणाऱ्या मॅकडोनाल्ड फूड कंपनीला एफएसएसएआयने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. काही दिवसांपूर्वी मॅकडोनाल्डने वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती.

Show cause notice to McDonald's | मॅकडोनाल्डला कारणे दाखवा नोटीस

मॅकडोनाल्डला कारणे दाखवा नोटीस

Next

मुंबई : चुकीची जाहिरात करणाऱ्या मॅकडोनाल्ड फूड कंपनीला एफएसएसएआयने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.
काही दिवसांपूर्वी मॅकडोनाल्डने वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीवर अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) आक्षेप घेतला आहे आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जाहिरातींमार्फत निरोगी जीवनशैलीचे महत्त्व कमी करू नये. एफएसएसएआयच्या परवानगीशिवाय फूड कंपन्यांनी आपले खाद्यपदार्थ जेवणाला पर्याय अशी जाहिरात करू नये. इतर खाद्य उत्पादकांच्या उत्पादनांशी तुलना करून त्यांचे उत्पादन कमी प्रभावी दाखवत आपल्या उत्पादनांची जाहिरात करू नये किंवा ग्राहकांच्या वर्तणुकीवर त्याचा परिणाम होऊ देऊ नये. या कायद्याचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मध्ये कलम (५३) नुसार १० लाख रुपयांपर्यंतचा दंड बसू शकतो. मॅकडोनाल्डने अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिराती आणि दावा) कायदा २०१८चे उल्लंघन केले असून मॅकडोनाल्डविरोधात कारवाई का करू नये, अशी विचारणा एफएसएसएआयने मॅकडोनाल्डला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये केली आहे.

एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अगरवाल म्हणाले, जनजागृती, प्रशिक्षण आणि कायद्याची अंमलबजाणी केली जात आहे. यासाठी देशभर इट राइट मोहीम सुरू आहे. देशातील नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत. यासाठी एफएसएसएआय प्रयत्न करीत आहे. चुकीच्या जाहिराती म्हणजे देशातील नागरिकांना विशेषत: लहान मुलांना हेल्दी आणि योग्य खाण्याची सवय लागावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेविरोधात आहे. त्यामुळे फूड कंपन्यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होईल, अशा जाहिराती करू नयेत.

दहा लाखांचा दंड
एफएसएसएआयनुसार, मॅकडोनाल्ड कंपनीने वृत्तपत्रात आपल्या खाद्य उत्पादनाची जाहिरात दिली. जाहिरात करताना हेल्दी फूडला अन्हेल्दी फूडचा पर्याय दिला आहे. ताजे शिजविलेले अन्न आणि भाज्या ज्या हेल्दी आहेत, त्याबाबत बेजबाबदारपणे अशी नकारात्मक जाहिरात करण्याची फूड कंपन्यांची प्रवृत्ती हा खूप गंभीर विषय आहे. अशा जाहिराती प्रकाशित केल्यास १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

राज्यभरातील मॅकडोनाल्डवर एफएसएसएआयने कारणे दाखवा नोटीस पाठविली असून त्यांची चूक सिद्ध झाली, तर त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे इतर फूड कंपन्यांनी याचे उदाहरण घेऊन स्वत:चे उत्पादन तपासणे गरजेचे आहे.
- डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन

Web Title: Show cause notice to McDonald's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न