Join us  

हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा एक लाख मिळवा; उद्धव ठाकरेंनी जाहीर केला इनाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 7:04 PM

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर हल्लाबोल केला. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा शेतकरी संवाद मेळावा झाला.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिंदे गटावर हल्लाबोल केला. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा शेतकरी संवाद मेळावा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फोटोंवरुन टीका केली. 

"उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन टीका केली. हेलिकॉप्टरनं शेतात फिरणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.  

उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ

मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. केवळ घोषणा केली नव्हती. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही असं विचारलं होतं. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझं उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केलं नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ आला तरी कृषी मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज काय? जो शेतकरी राबतोय तो आज विचारतोय मी खायचं काय? शिव्या खावून तुमचं पोट भरत असेल पण माझ्या शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार ते सांगा. पीक विमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज

व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे. जी कर्जमुक्ती आम्ही केली तिचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. तेव्हा सरकारने बँकेला गॅरंटी देऊन माफ करायला लावली होती. मात्र तोपर्यंत या रेड्यांनी शेण खाल्ले. कुणाचं नुकसान झाले? अतिवृष्टीचे पैसे कुणाला मिळाले त्यांनी हात दाखवावं. राज्य खोटं बोलून चाललं आहे. काही वाटेल ते चालले आहे. ही जनता भोळीभाबडी राहिली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे