Join us

मुंबईतील घोडपदेव परिसरात दुकानाला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 07:16 IST

मुंबईतील भायखळा पूर्वेकडील परिसरात असलेल्या रामभाऊ भोगले मार्गावर एका दुकानाला पहाटे आग लागली.  

मुंबईमुंबईतील भायखळा पूर्वेकडील परिसरात असलेल्या रामभाऊ भोगले मार्गावर एका दुकानाला पहाटे आग लागली.  या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. मात्र स्टेशनरी दुकानात भरलेल्या फटाक्यांना आग लागल्याने शेजारील आणखी तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. भायखळा अग्निशमन दलातील जवानांनी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करून आग शमवली. 

आग लागलेल्या दुकानाशेजारील मेडिकल आणि दूध डेरीमधून चार दुकानदारांची सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईआग