अंबरनाथमध्ये दरोड्याच्या उद्देशाने ज्वेलर्सवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:13 IST2021-01-13T04:13:37+5:302021-01-13T04:13:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथच्या पश्चिम भागातील सर्वोदयनगर परिसरात असलेल्या भवानी ज्वेलर्स या दुकानात रविवारी गोळीबार झाला. ज्वेलर्स ...

Shooting at jewelers with the intention of robbery in Ambernath | अंबरनाथमध्ये दरोड्याच्या उद्देशाने ज्वेलर्सवर गोळीबार

अंबरनाथमध्ये दरोड्याच्या उद्देशाने ज्वेलर्सवर गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथच्या पश्चिम भागातील सर्वोदयनगर परिसरात असलेल्या भवानी ज्वेलर्स या दुकानात रविवारी गोळीबार झाला. ज्वेलर्स मालकाने प्रतिकार केल्याने सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला. मात्र या घटनेत दुकानातील तिघे जखमी झाले असून एकाच्या पायाला गोळी लागली आहे. हा गोळीबार नेमका कुणी केला हे अद्याप समजलेले नाही.

दुचाकीवर आलेल्या काही हल्लेखोरांनी आधी दुकानात असलेल्या कामगारांशी चाकूचा धाक दाखवून हुज्जत घातली आणि त्यानंतर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले. यावेळी हल्लेखोरांनी बंदुकीतून सहा राउंड फायर केले. दुकानाच्या मालकाने हल्लेखोरांना प्रतिकार केल्याने त्या हल्लेखोरांनी सुरुवातीला चाकूने विसन दसाणा आणि भैरव सिंह यांना जखमी केले. त्यानंतर दुकानाचे मालक लक्ष्मण सिंग दसाणा यांच्या दिशेने बंदुकीतून गोळीबार केल्याने लक्ष्मण यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यानंतर बंदूक आणि चाकू तिथेच टाकून हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेनंतर नागरिकांनी तिघा जखमींना लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले, तर दुसरीकडे पोलिसांनी या हल्ल्यातील सूत्रधारांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: Shooting at jewelers with the intention of robbery in Ambernath