रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडूनच गर्भवती महिलेसह अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 06:45 IST2020-08-20T04:31:30+5:302020-08-20T06:45:33+5:30

अत्याचारानंतर गर्भवती महिलेच्या पोटावर काठीने मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Shocking! Sexual abuse of a minor girl with a pregnant woman by the police | रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडूनच गर्भवती महिलेसह अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडूनच गर्भवती महिलेसह अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : गर्भवती महिलेसह तिच्या ११ वर्षांच्या मुलीवर दोन पोलीस शिपायांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपावरून घाटकोपर पोलिसांनी शिपायांसह रिक्षाचालकाविरुद्ध बलात्कार, पॉक्सोअंतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला. अत्याचारानंतर गर्भवती महिलेच्या पोटावर काठीने मारल्यामुळे तिचा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घाटकोपरमध्ये राहणाऱ्या पीडित २८ वर्षीय महिलेच्या वतीने हेल्पकेअर फाऊंडेशनने याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील आरोपी पोलिसांनी १२ जानेवारी २०२० रोजी महिलेला धमकावले. त्यानंतर १५ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास ११ वर्षांच्या मुलीसोबत घरी असताना, दोघे पोलीस शिपाई आणि रिक्षाचालक तिच्या घरी आले. त्यावेळी तक्रारदार या अडीच महिन्यांच्या गर्भवती होत्या. आरोपी पोलिसांनी दोघींना मारहाण करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यात त्यांच्या पोटावर काठीने मारहाण केल्याने त्यांचा गर्भपात झाल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
सध्या दोन्हीही शिपाई घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी याबाबत कुणाला सांगितले नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shocking! Sexual abuse of a minor girl with a pregnant woman by the police