Mumbai Lokhandwala Model Crime: मुंबईतील जोगेश्वरी पश्चिममध्ये लोखंडवाला परिसरात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने थेट मॉडेलला कारने धडक देण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी मोहम्मद शकील शेखकडून मॉडेलच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर ॲसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर हा विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला.
नेमकं घडलं काय?
सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लोखंडवाला परिसरातील अरेना बिल्डिंगच्या गेटजवळ ही घटना घडली. संबंधित मॉडेल इमारतीच्या गेटजवळ उभी असताना आरोपीने अचानक स्कोडा कार तिच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहताच तिच्या मदतीसाठी दोन जण धावून आले. मात्र आरोपीने त्या तिघांवरही पुन्हा कार घालण्याचा प्रयत्न केला. डायना सईद असे या मॉडेलचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मॉडेलने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी हा डायनाविषयी मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये अफवा पसरवण्याचे काम करत होता. त्यावरून त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. ३ फेब्रुवारीला आरोपीला जाब विचारण्यासाठी डायना आणि तिची मैत्रीण गेली. आरोपी समोर येत नसल्याने त्यांनी त्याला बाहेर बोलवले पण तो आला नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर अँसिड हल्ल्याचा मेसेज आला आणि बिल्डींगच्या खाली आरोपी कार घेऊन आला. याचदरम्यान आरोपीने एकदा डायनाच्या अंगावर कार घालण्याचा तर एकदा तिच्या मैत्रिणींच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. घटनेत मॉडेल किरकोळ जखमी झाली, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
या प्रकरणी मॉडेलने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीचे नाव मोहम्मद शकील शेख असून तो २९ वर्षांचा आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी मॉडेलच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅट अकाउंटवरून अँसिड हल्ल्याची धमकी दिली होती. या धमकीबाबत विचारणा केली असता आरोपीला राग अनावर झाला. त्यातूनच त्याने टोक गाठले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Mumbai's Lokhandwala, a model was threatened with acid and then targeted by a car. The accused, Mohammed Shakeel Sheikh, allegedly sent acid attack threats and attempted to run her over after a dispute. Police are investigating the incident captured on CCTV.
Web Summary : मुंबई के लोखंडवाला में एक मॉडल को एसिड से धमकी दी गई और फिर कार से हमला करने की कोशिश की गई। आरोपी मोहम्मद शकील शेख ने कथित तौर पर एसिड हमले की धमकी दी और विवाद के बाद उसे कुचलने का प्रयास किया। पुलिस सीसीटीवी में कैद हुई घटना की जांच कर रही है।