धक्कादायक! उनो कार्डच्या खेळात पराभव झाल्याने तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 17:16 IST2018-03-05T17:16:11+5:302018-03-05T17:16:11+5:30

उनो कार्डसचा गेम खेळताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका तरुणाची हत्या झाली. शनिवारी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास दक्षिण मुंबईत आग्रीपाडा येथे  ही धक्कादायक घटना घडली.

Shocking The killing of the youth due to his defeat in the game of cards | धक्कादायक! उनो कार्डच्या खेळात पराभव झाल्याने तरुणाची हत्या

धक्कादायक! उनो कार्डच्या खेळात पराभव झाल्याने तरुणाची हत्या

ठळक मुद्देशनिवारी अबुझारने नूर मोहम्मद मन्सुरीला पाहिले व त्याला खेळण्यासाठी बोलावले. शेजारच्यांनी अबुझारला लगेच रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मुंबई - उनो कार्डसचा गेम खेळताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका तरुणाची हत्या झाली. शनिवारी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास दक्षिण मुंबईत आग्रीपाडा येथे  ही धक्कादायक घटना घडली. अबुझार अन्सारी (24) असे मृत तरुणाचे नाव आहे. आग्रीपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अबुझार नूर मोहम्मद मन्सुरीसोबत कार्डसचा गेम खेळत असताना ही घटना घडली. अबुझार कामावरुन घरी परतल्यानंतर आपली आई आयेशा अन्सारीसोबत वेळ घालवायचा आणि शेजारच्या लहान मुलांसोबत उनो कार्डसचा गेम खेळायचा. 

शनिवारी अबुझारने नूर मोहम्मद मन्सुरीला पाहिले व त्याला खेळण्यासाठी बोलावले. मन्सुरीही लगेच तयार झाला ते दोघे अन्सारीच्या घरासमोर उनो कार्डचा गेम खेळत होते. काहीवेळाने मन्सुरी अबुझारवर  खेळताना चिटिंग केल्याचा आरोप करत त्याच्या अंगावर जोरजोरात खेकसत होता.  अबूझार अन्सारीने मन्सुरीच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले व मोठमोठयाने हसत होता. 

त्यामुळे मन्सुरी जास्त चिडला. त्याने आपल्या खिशातून चाकू काढला व अन्सारीवर सपासप वार केले असे साक्षीदारांनी पोलिसांना सांगितले. शेजारच्यांनी अबुझारला लगेच रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी लगेच दोन तासात मन्सुरीला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    


 

Web Title: Shocking The killing of the youth due to his defeat in the game of cards

टॅग्स :Murderखून