धक्कादायक ! ‘एकच व्यक्ती चालवते रेशनची चाळीस दुकाने’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 02:29 IST2021-03-09T02:28:57+5:302021-03-09T02:29:19+5:30
आमदार रणधीर सावरकर यांनी प्रश्न विचारला होता. अशोक घुटवड यांच्या अकोली जहांगीर येथील दुकानात २३ सप्टेंबर २०२० रोजी तपासणी केली

धक्कादायक ! ‘एकच व्यक्ती चालवते रेशनची चाळीस दुकाने’
मुंबई : अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथे एकाच व्यक्तीकडून तब्बल ४० दुकाने चालविली जात असल्याच्या आरोपाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सोमवारी विधानसभेत दिले.
आमदार रणधीर सावरकर यांनी प्रश्न विचारला होता. अशोक घुटवड यांच्या अकोली जहांगीर येथील दुकानात २३ सप्टेंबर २०२० रोजी तपासणी केली असता ४१३ क्विंटल गहू, १५१ क्विंटल तांदूळ, ६ क्विंटल चणाडाळ, ९.५० क्विंटल अख्खा चणा असा १७ लाख रुपये किमतीचा अवैध धान्यसाठा आढळला होता, हे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी लेखी उत्तरात मान्य केले.