धक्कादायक! मृत मुलगी जन्मली म्हणून आईने शौचालयातच लावली विल्हेवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:58 IST2018-12-06T05:58:29+5:302018-12-06T05:58:35+5:30

सार्वजनिक शौचालयातच महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र, ती मृत असल्याचे समजताच, तिला तेथेच सोडून तिने घर गाठल्याचा प्रकार अंबोलीत सोमवारी उघडकीस आला आहे.

Shocking As the dead girl was born, the mother took her in the toilet | धक्कादायक! मृत मुलगी जन्मली म्हणून आईने शौचालयातच लावली विल्हेवाट

धक्कादायक! मृत मुलगी जन्मली म्हणून आईने शौचालयातच लावली विल्हेवाट

मुंबई : सार्वजनिक शौचालयातच महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र, ती मृत असल्याचे समजताच, तिला तेथेच सोडून तिने घर गाठल्याचा प्रकार अंबोलीत सोमवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी सुप्रिया सूर्यकांत कानेकर (१९) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंबोली परिसरात कानेकर या कुटुंबीयांसोबत राहतात. सोमवारी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता, तिथेच त्यांनी मुलीला जन्म दिला. मुलगी मृत असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी शौचालयातच मुलीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीतरी येत असल्याचे लक्षात येताच घर गाठले.
हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच, अंबोली पोलीस तेथे धडकले. त्यांनी मृत अर्भक शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. स्थानिकांनी गर्भवती महिलांची माहिती घेतली. तेव्हा चौकशीअंती अंबोली पोलीस कानेकरपर्यंत पोहोचले. त्या वेळी तिने वरील घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कानेकरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर, तिच्यावर कारवाई करण्यात येईल, असे अंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि भरत गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Shocking As the dead girl was born, the mother took her in the toilet