Join us

धक्कादायक! लेकाने व्यसन करून घातला वाद; ओशिवऱ्यात आईने केली मुलाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 09:32 IST

ओशिवरा येथील शुक्ला कंपाऊंडमध्ये आईने मुलाची चाकूने भोसकून हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ओशिवरा येथील शुक्ला कंपाऊंडमध्ये आईने मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. बिंदू दुबे (५०) ही गृहिणी तिच्या दोन मुलांसह राहते, तर तिचे पती हे उत्तर प्रदेशमध्ये राहतात. तिचा मोठा मुलगा शिवकुमार (२२) हा बेरोजगार असून त्याला अंमलीपदार्थांचे व्यसन लागले होते. 

शिवकुमार भांग खाऊन घरी परतला आणि त्याचा आईसोबत वाद सुरू झाला. बाचाबाची दरम्यान त्याने आईवर हँगरने हल्ला केला. तेव्हा त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना रागाच्या भरात तिने चाकूने छातीवर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ओशिवरा पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

टॅग्स :मुंबईमृत्यू