वर्सोव्यात आज शोभायात्रा

By Admin | Updated: May 1, 2017 04:25 IST2017-05-01T04:25:47+5:302017-05-01T04:25:47+5:30

हिंदू नववर्षानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्याची प्रथा आहे. मात्र, आता महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी, १ मे

Shobhayatra today in Versova | वर्सोव्यात आज शोभायात्रा

वर्सोव्यात आज शोभायात्रा

मुंबई : हिंदू नववर्षानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्याची प्रथा आहे. मात्र, आता महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी, १ मे रोजी सकाळी ८ वाजता वर्सोव्यात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. स्वप्नाक्षय मित्रमंडळ आणि मोटर्स आॅफ अंधेरी फूल पच्चीस यांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकीवर स्वार होत ही शोभायात्रा वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळील चाचा नेहरू उद्यानापासून काढण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Shobhayatra today in Versova