Join us  

अरविंद सावंत यांनी घेतला राजनाथ सिंह यांचा समाचार; ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 4:53 PM

राजनाथ सिंह हे आदरणीय आहेत त्यांच्यावर टीका-टीप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही. पण ते मूळ शिवसेनेवर बोललेत तेव्हा दु:ख झालं. तेव्हा स्पष्टपणे त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे असं अरविंद सावंत म्हणाले.

ठळक मुद्देही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहेशब्द न पाळणारी भाजपा वाजपेयी-अडवाणींची राहिली का? शिवसेनेने आयुष्यात कोणालाही धोका दिला नाही, शिवसेनेला अनेकांनी धोका दिला.

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील राजकारण चांगलचं रंगू लागलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा समाचार माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी घेतला आहे.

याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. मात्र शब्द न पाळणारी भाजपा वाजपेयी-अडवाणींची राहिली का? शिवसेनेने आयुष्यात कोणालाही धोका दिला नाही, शिवसेनेला अनेकांनी धोका दिला. शब्द न पाळणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात सावंत यांनी भाजपाचा समाचार घेतला.

तसेच राजकारणाचा व्यापार मांडताना नीतिमत्तेचे धडे देताना आपण किती नैतिकतेवर काम करतोय ते पाहावं. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक याठिकाणी काय घडतं ते सगळ्यांनाच दिसत आहे. ही राजकारणाची वेळ नाही सांगत पीएम केअर फंडाचं काय झालं? जम्मू काश्मीर, कर्नाटकात तुम्ही काय केलं? हे स्वत: पाहावं. राजनाथ सिंह हे आदरणीय आहेत त्यांच्यावर टीका-टीप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही. पण ते मूळ शिवसेनेवर बोललेत तेव्हा दु:ख झालं. तेव्हा स्पष्टपणे त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे असं अरविंद सावंत म्हणाले.

काय म्हणाले होते राजनाथ सिंह?

महाराष्ट्र सरकार हे संकट हाताळण्यास असमर्थ ठरले आहे, हे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीने हे दाखवून दिले आहे, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यांत घेऊन जाण्यासाठी आमच्या रेल्वे तयार होत्या. पण महाराष्ट्र सरकारने पुरेसे सहकार्य न केल्यामुळे त्यांची फरपट झाली. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जनतेने कौल दिला. पण आमच्या मित्रपक्षाने स्वार्थासाठी जनतेचा विश्वासघात केला. हीच ती स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे का? असा प्रश्न पडतो, महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. सोमवारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्राला ‘जनसंवाद रॅलीत’ मार्गदर्शन केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?

...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल

कोरोनाची वाढती संख्या पाहता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन, काय आहेत नियम?

टॅग्स :अरविंद सावंतशिवसेनाराजनाथ सिंहभाजपा