CoronaVirus News: अब्दुल सत्तार, फौजिया खान यांना कोरोनाची लागण; उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 23:15 IST2020-07-21T23:02:22+5:302020-07-21T23:15:34+5:30
CoronaVirus News: लीलावती रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार होम आयसोलेशनमध्ये

CoronaVirus News: अब्दुल सत्तार, फौजिया खान यांना कोरोनाची लागण; उपचार सुरू
मुंबई: शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याआधी त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लक्षणं आढळून येताच सत्तार यांनी लीलावती रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार फौजिना खान यांची कोरोना चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली आहे. फौजिया खान राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. मार्च महिन्यातच त्यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना त्यांनी शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपद भूषवलं आहे. फौजिया खान दोन वेळा विधानपरिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत.