राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्क दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 05:36 AM2019-02-23T05:36:45+5:302019-02-23T05:37:16+5:30

बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर होणार सभा

Shivaji Park is not given for Rahul Gandhi's meeting | राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्क दिले नाही

राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्क दिले नाही

Next

मुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या १ मार्चच्या जाहीर सभेसाठी शिवाजी पार्क मैदान देण्यास ंमुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. सत्ताधाऱ्यांच्या इशाºयानुसार पालिका प्रशासनाने सभेला परवानगी नाकारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला.

सभेसाठी मुंबई काँग्रेसने सभेसाठी शिवाजी पार्कची विनंती पत्रान्वये पालिकेकडे केली होती. मात्र परवानगी न मिळाल्याने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर राहुल यांची सभा होणार आहे. शिवसेना, मनसे, भाजपा, वंचित बहुजन आघाडीला हे मैदान मिळते, पण राहुल गांधींसाठी सरकार परवानगी देत नसल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांची उद्या, शनिवारी शिवाजी पार्कवर ओबीसी परिषद होणार आहे. तिला एमआयएमचे नेते ओवेसीही येणार आहेत. त्यांच्या परवानगी देण्यासाठी मंत्रालयातून पालिका अधिकाºयांना निर्देश देण्यात आल्याचा आरोप निरूपम यांनी केला.

राहुल गांधी १ मार्चला महाराष्ट्रात येत आहेत. या दौºयात मुंबई आणि धुळे येथे ते जाहीर सभा घेतील. त्यांच्या सभेच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकण्याची जय्यत तयारी काँग्रेसने केली आहे. धुळ्यातील सभा शिवाजी शिक्षण विद्या प्रसारक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. यापूर्वी इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनीही याच मैदानातून काँग्रेसच्या सभांना संबोधित केले होते. मुंबईतील सभेसाठी शिवाजी पार्क नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसने एमएमआरडीएचे मैदान बुक केले आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, संजय निरूपम आदी नेत्यांनी शुक्रवारी एमएमआरडीए मैदानाला भेट देत पाहणीही केली.

मनसेला विरोध कायम
विरोधकांच्या महाआघाडीत मनसेच्या समावेशाला काँग्रेसने स्पष्ट नकार दिल्याचे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.
मनसेला महाआघाडीत घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, समविचारी पक्षांची आघाडी असावी, असा महाआघाडीचा उद्देश आहे. मनसेबरोबर वैचारिक मतभेद असल्याने त्यांना महाआघाडीत स्थान देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीला कळविण्यात आली
असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Shivaji Park is not given for Rahul Gandhi's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.