मुंबई : चौदा हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझेक पोट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी साकारले आहे. साडेसहा बाय सात फुटांचे हे मोझेक पोट्रेट आहे. चेतन राऊत यांचा एक चाहता सुमीत करंगुटकर हा दादर येथे राहत असून त्याच्या घरी मंगळवारी मोझेक पोट्रेटचे अनावरण करण्यात आले. पोट्रेटसाठी २८ रंगछटांचा वापर करण्यात आला आहे. हे पंचमुखी रुद्राक्ष नैसर्गिक असून नेपाळवरून मागविले जातात. महाराजांच्या पोट्रेटसाठी लागणारे रुद्राक्ष भुलेश्वर मार्केटमधून खरेदी करण्यात आले. पंचमुखी रुद्राक्ष झाडावरून काढलेले असतात, त्यामुळे त्यांचा आकार हा कमी-जास्त प्रमाणात असतो. दादर येथे चाहत्यांच्या घरी असलेलेपोट्रेट इतर लोकांनाही पाहता येणार आहे. चेतन राऊत याबाबत म्हणाले की, जातीवाद थांबला पाहिजे. कामाचे नियोजन युवापिढीने आत्मसात करावे. स्त्रियांना आदराची वागणूक द्यावी, असे संदेश याद्वारे देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
१४ हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून शिवाजी महाराजांचे मोझेक पोट्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 06:30 IST