Join us

शिवसेनेचा दारूण पराभव, 21 पैकी 21 जागा जिंकत भाजपच वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 10:05 IST

डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर व शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत स्व.रघुवीर सामंत पॅनेलने विजय मिळवला.

मुंबई - डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर व शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत स्व.रघुवीर सामंत पॅनेलने विजय मिळवला. भाजपपुरस्कृत या पॅनेलने शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनेलचा दारुण पराभव करत सर्वच 21 उमेदवारांना विजयी केले, अशी माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात ही निवडणूक पार पडली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, शिवसेनेला या निवडणुकीत साधे खातेदेखील उघडता आले नाही.त्यांची निशाणी विमान होती. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने साधे टेक ऑफ सुद्धा केले नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली. तर सहकाराचा व मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाचा व पारदर्शकतेचा हा विजय असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले.

टॅग्स :भाजपा