Join us

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो, आशिष शेलारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 04:31 IST

Ashish Shelar News : शिवसेनेचा महाविजयी मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो होता. ठाकरे यांना त्यांची सत्ता टिकेल याविषयी शंका आहे. त्यामुळेच ते एकसारखे सरकार पाडून दाखवा, अशी ओरड करतात.

मुंबई - पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनाैत यांनी शिवसेनेबद्दल जे वक्तव्य केले त्याचे दडपण, रा. स्व. संघाच्या आड स्वत:ला लपवून घेणे आणि भाजपच्या ताकदीची दहशत किती वाटते हे सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रविवारच्या दसरा मेळाव्यातील भाषणात दिसले, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली.ते म्हणाले, शिवसेनेचा महाविजयी मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो होता. ठाकरे यांना त्यांची सत्ता टिकेल याविषयी शंका आहे. त्यामुळेच ते एकसारखे सरकार पाडून दाखवा, अशी ओरड करतात. पण आमच्या नेत्यांनी आधीच सांगितले आहे की, हिंमत असेल तर सरकार चालवून दाखवा. पण आता तर हिंमत असेल तर बाहेर उतरून दाखवा, असे म्हणायची वेळ आली आहे. धर्माच्या नावाखाली सरकार पाडण्याचा प्रयत्न, असा आता नवीन आरोप केला जातो. पण जे सरकार कर्माने पडणार आहे ते धर्माने पाडायची गरज नाही, असे शेलार म्हणाले.

टॅग्स :आशीष शेलारशिवसेना