Join us  

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकच संजय राऊत यांना धरुन चोपेल; निलेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 3:58 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या पाच सहा दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत खिंड लढवली होती.

मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपाने नकार दिल्यानंतर निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या पाच सहा दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत खिंड लढवली होती. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी मला काल पासून असं वाटतयं की येणाऱ्या काही दिवसात शिवसैनिकच संजय राऊत यांना धरुन चोपेल असं ट्विट करत निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी याआधी देखील ट्विट करत संजय राऊत इतके गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला शरद पवार यांच्या घरी जावं लागतं. त्यामुळे बाकी राहुद्या अगोदर संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे द्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या' असं म्हणत निलेश राणे यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

राज्यातील सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली राज्यात घडत आहे. दिल्लीत काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांची बैठक सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत होत आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मुंबईतील ताज लँड या हॅाटेलमध्ये जवळपास 45 मिनिटे महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामुळे राज्यात शिवआघाडीचे सरकार स्थापन होणार की नाही हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :संजय राऊतनिलेश राणे शिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019