Join us
Daily Top 2Weekly Top 5

Andheri Bypolls : चिन्ह, नाव गोठवलंत तरी पळालात! उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 07:43 IST

अंधेरी पूर्वमधील माघारीवरून उद्धव ठाकरेंची टीका.

मुंबई : माझ्या पक्षाचे चिन्ह, नाव तुम्ही गोठवलं, तरीही पळालात, अशी खोचक टीका अंधेरी पूर्वमधील माघारीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. बुलडाणा जिल्ह्यातून आलेल्या शिवसैनिकांशी ठाकरे यांनी मातोश्रीवर संवाद साधला. 

ठाकरे म्हणाले की, केवळ मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, छळायचे आणि शिवसेना संपवायची याच हेतूने हे सर्व करण्यात आले. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचे, शस्त्राचे एक महत्त्व असते. धनुष्यबाण रामाचे होते. त्याने रावणाला मारले. मशाल अन्यायाला जाळते. अंधारात वाट दाखवते. ती मशाल आता आपल्याकडे आहे, असे ठाकरे म्हणाले. 

निवडणूक आयोगाने आपले नाव आणि चिन्ह काही ठराविक काळासाठीच गोठवले आहे. आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर ते आपल्याला पुन्हा मिळणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस