Join us  

शिवसेनेने दिला भाजपाला धक्का; कृष्णा हेगडे यांनी बांधले हातात शिवबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 10:15 PM

विलेपार्ले येथील युवसेनेच्या एका कार्यक्रमांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृष्णा हेगडे यांना हातात शिवसेनेत शिवबंधन बांधत शिवसेनेत त्यांना प्रवेश दिला

- मनोहर कुंभेजकरमुंबई : मुंबई भाजपाचे सचिव समीर देसाई यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता.आता मुंबई भाजपा उपाध्यक्ष व विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत आज रात्री प्रवेश केला. हेगडे यांच्या प्रवेशामुळे पार्ल्यात सेनेचा गड अधिक मजबूत होईल अशी चर्चा आहे.

विलेपार्ले येथील युवसेनेच्या एका कार्यक्रमांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृष्णा हेगडे यांना हातात शिवसेनेत शिवबंधन बांधत शिवसेनेत त्यांना प्रवेश दिला. शिवसेनेत सामील होणारा ते पहिले दक्षिण भारतीय चेहरा आहेत.सेनेचे रणनीतिकार आणि राज्याचे परिवहन मंत्री,विभागप्रमुख अँड.अनिल परब आणि युवा सेनेचे सचिव  वरुण सरदेसाई  कृष्णा  हेगडे यांच्याशी विस्तृत चर्चा झाली.त्यानंतर त्यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांची 2004 ची लोकसभा निवडणूक यशस्वीरित्या हाताळल्याने मुंबई उपनगरातील  सेनेसाठी ते उपयुक्त ठरतील. माजी खासदार प्रिया दत्तची  2005 आणि 2009 ची  लोकसभा निवडणूकही त्यांनी यशस्वीरीत्या हाताळली होती.कामगार सेवा संघाचे अध्यक्ष व  मुंबई उपनगरातील रिक्षाचालक आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनचे ते नेतृत्व करतात.

शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी महापौर दिवंगत डॉ. रमेश प्रभू यांचे हेगडे हे जावई आहेत. तर त्यांच्या पत्नी लीना प्रभु ही माजी राज्यपाल गणपतराव तापसे यांची नात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना संकटांचे व्यवस्थापन आणि कठीण काळात महाराष्ट्राचे मार्गदर्शन कसे केले याने मी प्रभावित झालो. मी शिवसेनेसाठी कठोर परिश्रम करेन आणि पुन्हा एकदा आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा  भगवा डोमाने फडकवण्यासाठी सुनिश्चित प्रयत्न करेल असे हेगडे यांनी सांगितले .

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा