Join us  

राम मंदिर निर्माणासाठी उद्धव ठाकरे आता चंद्रभागेच्या तीरावर करणार आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 11:53 AM

अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेली शिवसेना आता 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरयूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत.

ठळक मुद्देराम मंदिर निर्माणासाठी उद्धव ठाकरे आक्रमकचंद्रभागेच्या तीरावर करणार आरती 'विठाई' एसटीसेवेचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई -  अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेली शिवसेना आता 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरयूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. यानंतर विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन अयोध्येत राम मंदिर बांधण्याची सुबुद्धी सरकारला द्या, असे साकडे घालणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या 'विठाई' या नवीन एसटीसेवेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या सभेसाठी शिवसैनिकांसह राज्यभरातील वारकरी हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.  राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. संघटना आणि पक्ष म्हणून आपण दुष्काळग्रस्तांना मदत करतच आहोत. तरीही दुष्काळप्रश्नी आपण सरकारला जागे केले पाहिजे, असे ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती आहे. 

(राम मंदिर राजकीय नव्हे; देशाच्या अस्मितेचा प्रश्न - संजय राऊत)

राम मंदिराचा मुद्दा आणखी पुढे जावा यासाठी शिवसेनेने 24 डिसेंबरला पंढरपुरात सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :उद्धव ठाकरेराम मंदिरअयोध्या