Join us

बदलाचे वारे?... मुंबईतील पोटनिवडणूक शिवसेना-भाजपा एकत्र लढवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 18:39 IST

एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सतत झगडणाऱ्या भाजपा आणि शिवसेना या जुन्या मित्रांनी मुंबईतील एका पोटनिवडणुकीसाठी युती करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

मुंबईः एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सतत झगडणाऱ्या भाजपा आणि शिवसेना या जुन्या मित्रांनी मुंबईतील एका पोटनिवडणुकीसाठी युती करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

सायन-प्रतीक्षानगर येथील प्रभाग क्रमांक १७३चे शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं जानेवारी महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असल्याची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली. 

सायन-प्रतीक्षानगर पोटनिवडणुकीत शिवसेना जो उमेदवार ठरवेल त्यालाच समर्थन देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं आशीष शेलार यांनी सांगितलं.

टॅग्स :मुंबईशिवसेनाभाजपा