राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला मोठं यश आले, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार लढत दिला. या निवडणुकीत महायुतीने ११६ जागांवर तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने ७२ जागेवर विजय मिळवला. दरम्यान, या निकालावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट केली. अंधारे यांनी सोशल मीडियावर केलेल्या फेसबुक पोस्टमधून सध्याच्या राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केले आहे. ठाकरे गटातील नेते शिंदेसेना किंवा भाजपमध्ये गेल्यानंतर सातत्याने “ठाकरेंना धक्का” अशा बातम्या प्रसिद्ध केल्या जात होत्या, यावरुन अंधारे यांनी भाष्य केले.
निवडणूक निकालांकडे पाहता वास्तव वेगळे असल्याचे सांगत सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, ठाकरेंच्या जीवावर राजकारणात बळावलेले काही नेते जरी पक्ष सोडून गेले असले, तरी सर्वसामान्य शिवसैनिकांनी जीवाचे रान करून पुन्हा पक्षाची ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. या शिवसैनिकांच्या मेहनतीचे प्रतिबिंब निकालांतून स्पष्टपणे दिसून येते, असा दावा त्यांनी केला आहे.
सदा सरवणकर यांची दोन्ही मुले, रवींद्र वायकर यांची मुलगी तसेच राहुल शेवाळे यांच्या भावजय यांचा दारुण पराभव झाल्याचा उल्लेख करत, त्यांच्या पक्षांतरामुळे ठाकरेंना फारसा फरक पडलेला नाही, हेच यातून स्पष्ट होते, असे अंधारे यांनी नमूद केले आहे. या निवडणुकीत ठाकरेंनी ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवली. मुंबईकरांनी ‘धनुष्यबाण’ नाकारून ‘मशाल’ स्वीकारली, याचा अर्थ मतदारांसाठी चिन्ह कोणते आहे यापेक्षा ते चिन्ह ठाकरेंकडून आले आहे का, हे अधिक महत्त्वाचे ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाने ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणातून एकनाथ शिंदे यांना वेगळे केल्याचा आरोप करत, शिंदे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र लढले असते, तर भाजपची परिस्थिती अधिक कठीण झाली असती, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच काँग्रेस आणि इतर पक्षांना मिळालेल्या जागा पाहता भाजपला निर्विवाद यश मिळालेले नाही, असेही त्या म्हणाल्या.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने अजित पवार यांच्यासोबतही हाच प्रयोग केल्याचा आरोप करत, दोन पवारांमधील वादाचा राजकीय लाभ भाजपाने उचलल्याचे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. शिंदे आणि अजित पवार यांना ज्या दिवशी हे कटू सत्य उमगेल, तो दिवस त्यांच्यासाठी सुदिन ठरेल, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.
Web Summary : Despite defections, Shiv Sainiks rebuilt the party, reflected in election results, says Sushma Andhare. She highlights BJP's divisive politics, suggesting a united front would have challenged them more effectively. She also noted BJP benefited from Pawar's family disagreements.
Web Summary : सुषमा अंधारे का कहना है कि दलबदल के बावजूद, शिव सैनिकों ने पार्टी का पुनर्निर्माण किया, जो चुनाव परिणामों में दिखता है। उन्होंने भाजपा की विभाजनकारी राजनीति पर प्रकाश डाला, और सुझाव दिया कि एक संयुक्त मोर्चा उन्हें अधिक प्रभावी ढंग से चुनौती दे सकता था। उन्होंने यह भी कहा कि भाजपा को पवार के परिवार के झगड़ों से फायदा हुआ।