Join us  

32 गणेश मूर्तींचे शिवसैनिकांनी केले अनोखे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 9:16 PM

आरे कॉलनीत मंगळवारी सकाळी फिरायला गेलेल्या बिंबिसार नगर मधील रहिवाशी दीप मल्होत्रा यांना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारच्या जागेत अनाहूत व्यक्तींनी 32 गणेश मूर्ती सोडून दिल्याचे आढळले

मुंबई: आरे कॉलनीत मंगळवारी सकाळी फिरायला गेलेल्या बिंबिसार नगर मधील रहिवाशी दीप मल्होत्रा यांना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारच्या जागेत अनाहूत व्यक्तींनी 32 गणेश मूर्ती सोडून दिल्याचे आढळले, ते व त्याचे वडील  सुरींदर मल्होत्रा हे गणेश भक्त असल्यामुळे सदर घटनेमुळे अत्यंत अस्वस्थ झाल्याने त्या गणेश मूर्तींचे विसर्जन जोगेश्वरी पूर्व येथील शिवसैनिकांनी केले.

दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे मूर्ती भिजून दुरावस्था होण्याची शक्यता होती ,त्यामुळे कोणाच्या दृष्टीस पडण्यापूर्वी त्वरेने त्याचे विसर्जन होणे अत्यावश्यक होते म्हणून त्यांनी त्यांची अस्वस्थता स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख विलास तावडे यांना फोन करून सांगितली. त्यानंतर त्यांनी मुंबईबाहेर त्यांच्या गावी कोंकणात जाण्याच्या वाटेवर होते, तरीसुद्धा त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून तत्परतेने प्रतिसाद देऊन शिवसेना कार्यालायप्रमुख राजन साळवी व शिवसेना व्यापारी कक्षाचे अध्यक्ष  दिलीप राणे याना सदर घटनेची माहिती दिली व पाहणी करून त्वरित विसर्जन करण्याबाबत सूचना केली. 

त्यानुसार  दीप मल्होत्रा, सुरींदर मल्होत्रा, पिंटो, बाला सुब्रमण्यम, दिलीप राणे व  राजन साळवी यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन पाहणी केली व एकूण सर्व ३२ मूर्तीचे आज जोगेश्वरी पूर्व येथील श्यामनगर तलावात नेऊन विसर्जन केले,यासाठी जय कोच टेम्पो स्टँडचे अध्यक्ष  प्रकाश माने यांनी त्वरेने स्वतःचा टेंपो विनामूल्य उपलब्ध करून साहाय्य केले. कोणताही अनर्थ होण्यापूर्वीच गणेश मूर्तीचे यथोचितरित्या विसर्जन करण्याच्या या सर्व गणेश भक्तांच्या कार्याची जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघात सर्वजण प्रशंसा करीत आहेत.

टॅग्स :गणेश महोत्सवमुंबई मान्सून अपडेटपाऊस