फौजदारासह शिपाई गजाआड

By Admin | Updated: July 1, 2014 01:18 IST2014-07-01T01:18:57+5:302014-07-01T01:18:57+5:30

मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बोरीवली स्थानकावर अटक केली.

Shipyard Gaza Aad with the Faujdar | फौजदारासह शिपाई गजाआड

फौजदारासह शिपाई गजाआड

>मुंबई : मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बोरीवली स्थानकावर अटक केली. एका गुन्ह्याच्या तपासासाठी या दोघांनी फिर्यादीकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली व ते स्वीकारल्याचे एसीबीच्या तपासात स्पष्ट झाले होते.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक दीपक वसंतराव तोंडे आणि पोलीस शिपाई रमाकांत रेवंडकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्यादी हे भंगार व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पंजाबमधील काही व्यक्तींविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांचा तपास तोंडेंकडे होता. या प्रकरणाच्या तपासासाठी जालंधर शहरात जावे लागेल, असे सांगून फिर्यादीकडून 1क् हजार रुपयांची लाच घेतली होती. नंतर या दोघांनी जालंधर येथे वास्तव्य केलेल्या हॉटेलचे 1क् हजार रुपयांचे बिल आणि अमृतसर येथे जाण्यासाठी आणखी पाच असे एकूण 15 हजार रुपये मागितले. तेव्हा फिर्यादीने या दोघांची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीच्या प्राथमिक तपासात या बाबी स्पष्ट झाल्या. दरम्यान, हे दोघे आज सकाळी बोरीवलीला उतरणार याची माहिती मिळताच एसीबीने सापळा रचला व रेल्वेतून उतरताच त्यांना गजाआड केले. (प्रतिनिधी)
 
एसीबीचे आवाहन
लाच दिल्याशिवाय काम होत नाही, ही भावना मनातून काढून टाका. काम करणो हे शासकीय कर्मचा:याचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही खात्यातला, कोणत्याही पदावरला अधिकारी लाच मागत असल्यास किंवा लाचेसाठी काम अडवून ठेवत असल्यास त्याला प्रोत्साहन न देता एसीबीकडे तक्रार करा. तक्रारीसाठी 18क्क् 222 क्21 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येईल.
 
निरीक्षकावर 
कारवाई होणार?
लाच घेताना पोलीस अधिकारी-कर्मचारी अटक झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर ठेवून त्याच्यावरही कारवाई होणार, असा निर्णय आयुक्त राकेश मारिया यांनी नुकताच जाहीर केला होता. तसे आदेशही संबंधितांना दिले होते. त्यानुसार मालवणीचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते.  

Web Title: Shipyard Gaza Aad with the Faujdar