मुंबई - नाट्यगृहांच्या भाडेवाढीवर निर्माते व कलावंतांनी नाराजी व्यक्त केल्याने शिंदेसेनेनेही त्याविरोधात भूमिका घेतली असून भाडेवाढ मागे घेण्याची मागणी गटनेते अमेय घोले यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. प्रशासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून ही भाडेवाढ पाच टक्केच असल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
अन्य राजकीय पक्षांचे मौनज्या ठिकाणी सेवाशुल्क आकारले जाते, तेथे दरवर्षी दहा टक्के वाढ केली जात असताना नाट्यगृहांसाठी केवळ पाच टक्केच भाडेवाढ केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या भाडेवाढीला नाट्यनिर्माते, कलावंत व इतरांनी तीव्र विरोध केला असूनही पालिकेने आपली भूमिका कायम ठेवली आहे. भाजप किंवा अन्य पक्षांनी या भाडेवाढीसंदर्भात आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
सेवाशुल्कात दरवर्षी वाढज्या ठिकाणी सेवाशुल्क आकारले जाते, अशा विविध आस्थापना किंवा अन्य ठिकाणी लेखा विभागाच्या परिपत्रकानुसार दरवर्षी दहा टक्के वाढ केली जाते. त्यानुसार यंदाही भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र, नाट्यगृहांसाठी ती दहा टक्के न करता फक्त पाच टक्के करण्यात आली आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लहान नाट्यनिर्मात्यांना मोठा फटकामहापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ केल्यामुळे विविध नाट्य निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नाट्यसंस्थांनी या निर्णयाविरोधात आपली निवेदनेही सादर केली आहेत. पालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात केलेल्या दरवाढीमुळे मराठी रंगभूमीवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाट्यगृहांच्या भाड्यात अचानक वाढ केल्यास लहान निर्माते आणि प्रायोगिक नाट्यसंस्था यांच्यावर मोठा आर्थिक ताण येईल. याचा थेट परिणाम मराठीनाटकांच्या प्रयोगांवर आणि एकूणच सांस्कृतिक उपक्रमांवर होऊ शकतो. भाडेवाढ कमी करण्याबाबत होत असलेली मागणी लक्षात घेता, प्रशासनाने या भाडेवाढीचा फेरविचार करावा, भाडेवाढ तत्काळ स्थगित करावी, अशी विनंती घोले यांनी केली आहे.
Web Summary : Shinde Sena opposes the 5% theater rent increase, requested rollback. The municipality insists it's only a 5% hike, citing service charge increases. Small producers fear financial strain, impacting Marathi plays and cultural events.
Web Summary : शिंदे सेना ने नाट्यगृह के किराए में 5% वृद्धि का विरोध किया, वापसी का अनुरोध किया। नगरपालिका का कहना है कि यह केवल 5% की वृद्धि है, सेवा शुल्क में वृद्धि का हवाला दिया गया। छोटे निर्माता वित्तीय तनाव से भयभीत हैं, जिससे मराठी नाटकों और सांस्कृतिक कार्यक्रमों पर असर पड़ेगा।