मुंबई : शिंदे सेनेत संघटनात्मक घडामोडी वेगाने सुरू आहेत. मुंबईतील ३६ विधानसभांपैकी तब्बल ३२ मतदारसंघात दि,६ सप्टेंबर रोजी प्रभारी विभागप्रमुखांची नेमणूक करण्यात आली.मात्र १० दिवस झाले तरी पश्चिम उपनगरात अजूनही चारकोप आणि कांदिवली( पूर्व ) ही दोन विधानसभा क्षेत्रे रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कोणत्या शिंदे सेनेच्या कोणत्या विद्यमान पदाधिकाऱ्यांला संधी मिळणार, याची कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.
रिक्त असलेल्या मतदारसंघांत प्रामुख्याने मराठी लोकसंख्या असून, येथे मराठी प्रभारी विभागप्रमुख द्यावेत अशी मागणी स्थानिकांमधून सातत्याने होत आहे.
विशेषतः चारकोप विधानसभा हा बहुल मराठी लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे येथे मराठी विभाग प्रमुख देण्यात यावा, असा ठाम सूर आजी-माजी पदाधिकारी आणि स्थानिक जनतेने लावला आहे.
चारकोपमध्ये मराठी नेतृत्वच हवे, कारण इथल्या जनतेच्या भावना आणि विश्वास हेच आमचं बळ असल्याचे येथील एका स्थानिक पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आता शिंदे सेना पुढील संघटनात्मक पावले कोणत्या दिशेने पडतात, आणि मराठी नेतृत्वाच्या मागणीला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे साऱ्यांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.