शिल्पा शेट्टीचे फोटो काढणा-या फोटोग्राफर्सना बाऊंन्सर्सनी रक्त येईपर्यंत मारले, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 11:04 IST2017-09-08T10:15:12+5:302017-09-08T11:04:47+5:30

मुंबई, दि. 8 - खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणा-या ...

Shilpa Shetty's photo-taking photographs have been blamed by Hotel Bouncers | शिल्पा शेट्टीचे फोटो काढणा-या फोटोग्राफर्सना बाऊंन्सर्सनी रक्त येईपर्यंत मारले, गुन्हा दाखल

शिल्पा शेट्टीचे फोटो काढणा-या फोटोग्राफर्सना बाऊंन्सर्सनी रक्त येईपर्यंत मारले, गुन्हा दाखल

मुंबई, दि. 8 - खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणा-या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊंन्सर्सनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोन्ही फोटोग्राफर्स या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. फोटोग्राफर्सनी तक्रार दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून दोन बाऊंन्सर्सना अटक केली आहे. सोनू आणि हिमांशु शिंदे हे दोन फोटोग्राफर्स जखमी झाले आहेत. 

गुरुवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान ही घटना घडली. शिल्पा आणि तिचा पती खारच्या बॅस्टियन हॉटेलमध्ये आले होते. शिल्पा आणि राज कुंद्रा हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. शिल्पा सुद्धा कोणतेही ओढेवेढे न घेता नेहमीच्या शैलीत कॅमे-याला वेगवेगळया पोझ देत होती. त्याच दरम्यान दोन बाऊंन्सर्स तिथे आले व त्यांनी फोटोग्राफर्सना तिथून जाण्यास सांगितले. फोटोग्राफर्सनी बाऊंन्सर्सकडे दुर्लक्ष करुन फोटो काढण्याचे काम चालूच ठेवले. 

फोटो सेशन झाल्यानंतर शिल्पा आपल्या गाडीत बसताच बाऊंन्सर्सनी फोटोग्राफर्सना मारहाण सुरु केली. यात सोनू आणि हिमांशुला रक्त येईपर्यंत बाऊंन्सर्सनी मारहाण केली. या मारहाणीत एका फोटोग्राफरचे कपडे देखील फाटले त्यांच्या चेह-यातून रक्त येत होते. या घटनेनंतर फोटोग्राफर्सनी लगेच पोलिसांना 100 नंबरवर फोन केला. पण कोणीही फोन उचलला नाही किंवा मदतीसाठी पुढे आले नाही असे फोटोग्राफर्सचे म्हणणे आहे. हॉटेलच्या मालकाने स्वत:हून फोन केल्यानंतर तासाभराने पोलिस तिथे पोहोचले. 

Web Title: Shilpa Shetty's photo-taking photographs have been blamed by Hotel Bouncers