शिजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, उद्या करणार मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 09:16 IST2023-01-01T09:15:49+5:302023-01-01T09:16:31+5:30

शिजानला घरचे जेवण, कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी मिळावी तसेच २ जानेवारीपर्यंत त्याचे केस कापण्यात येऊ नयेत, अशी मागणीही वकिलांनी केली.

Shijan will be remanded to judicial custody for 14 days, will make a big secret blast tomorrow | शिजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, उद्या करणार मोठा गौप्यस्फोट

शिजानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, उद्या करणार मोठा गौप्यस्फोट

नालासोपारा : ‘अलिबाबा दास्तान-ए-काबूल’ मालिकेतील अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्याप्रकरणी आरोपी अभिनेता शिजान खानला शनिवारी वसई न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.  

न्यायालयाने वालीव पोलिसांनी केलेली वाढीव पोलिस कोठडीची मागणी फेटाळली. यावेळी त्याच्या वकिलांनी सोमवारी गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले. शिजान मानसिक तणावात असून त्याला समुपदेशन मिळावे, तसेच या प्रकरणात मीडिया ट्रायल सुरू असल्याने त्याच्या जीवाला धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी न्यायालयात केली.

शिजानला घरचे जेवण, कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी मिळावी तसेच २ जानेवारीपर्यंत त्याचे केस कापण्यात येऊ नयेत, अशी मागणीही वकिलांनी केली. शिजानच्या जामिनासाठी सोमवारी अर्ज केला जाणार आहे. तुनीषाच्या आईने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहे. दरम्यान, या प्रकरणात लव्ह जिहादची शक्यता पोलिसांना फेटाळून लावली आहे. 

Web Title: Shijan will be remanded to judicial custody for 14 days, will make a big secret blast tomorrow