मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना उद्धव-राज एकमेकांपासून केवळ राजकीयदृष्ट्वाच नाही तर कौटुंबिक पातळीवरही खूप दूर गेले. शनिवारी त्यांच्यातील अबोला संपला, बुराना दूर पळून गेला आणि दोघांनी एकमेकांना सन्माननीय संबोधले; त्यावेळी दोघांच्या कार्यकत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
राज ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच 'सन्माननीय उद्भव ठाकरे' असे म्हणाले. त्यावेळी टाळ्यांच्या अभूतपूर्व कडकडाटाचे सभागृह साक्षीदार बनले. जे अनेकांना जमले नाही ते (दोघांचे एकत्र येणे) ते फडणवीसांनी करून दाखविले, या त्यांच्या वाक्यालाही तशीच दाद मिळाली. उद्धव ठाकरे है राज ठाकरेंपेक्षा सात-आठ वर्षांनी मोठे आहेत. आपल्या भाताला ते भाषणात काय संबोधतील या बाबत उत्सुकता होतीच. उद्धव ठाकरे म्हणाले.. ब-याच वर्षांनंतर मी आणि राज एका व्यासपीठावर आलो आहोत. राजने मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हटले. साहजिकच आहे की त्याचे कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेले आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात मी 'सन्माननीय राज ठाकरे' अशी करतो. उद्धव यांच्या या वाक्यावर सभागृह टाळ्या आणि घोषणांनी दणाणून गेले. उद्धव केसळ तेवढधावरच थांबले नाहीत. राज यांच्या भाषणाचे त्यांनी खूप कौतुक केले. राजने अप्रतिम मांडणी केली आहे, खरेतर आता माझ्या भाषणाची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, भाषण संपतून राज आपल्या खुर्चीवर बसत असताना उद्धव यांनी त्यांना हात मिळविला आणि भाषण खूप छान झाल्याचे कौतुक हावभावांमधूनच केले.
शिवसैनिक, मनसैनिक सुखावले
मातोश्रीवरून उद्धय ठाकरे तर शिवतीर्थचरून राज ठाकरे वेगवेगळे सभास्थळी रवाना झाले. उद्धव आधी पोहोचले आणि त्यानंतर काहीच मिनिटांत राजही दाखल झाले. सभेसाठी दोघांनी सोबतच व्यासपीठावर जायचे असे आधीच ठरले होते.
व्यासपीठावर आण्याआधी दोघांनी काही मिनिटे चर्चा केली. व्यासपीठावर बसले असतानाही ते एकमेकांशी छान संवाद साधत असल्याचे चित्र शिवसैनिक आणि मनसैनिकांना सुखावून गेले. राज यांचे भाषण आधी तर उद्धव यांचे भाषण नंतर झाले. उद्धव हे राज यांच्यापेक्षा जास्त वेळ बोलले. उद्धव ठाकरे यांनी शेवटी भावाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.