Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार जे बोलतात; त्याचा उलट अर्थ काढायचा असतो - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 05:08 IST

उद्धव ठाकरे यांचा पवारांना टोला

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार जे बोलतात त्याचा नेहमी उलट अर्थ काढायचा असतो. ते जेव्हा संघ किती चिवटपणे काम करतो म्हणतात त्या वेळी त्याचा काय अर्थ काढायचा हे तुम्ही ठरवा, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार आणि संघ दोघांवरही निशाणा साधला.

शिवसेना ही किती नेटाने जनतेसाठी काम करते हे मी सांगण्याची गरज नाही, ते कृतीतून दिसते. औरंगाबादेत अंबादास दानवे यांनी पीक विमा योजनेसाठी जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना एकत्र आणले, विमा कंपन्यांचे अधिकारी तेथे बोलावले आणि त्यातून साडेआठ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला, हेच मॉडेल सर्व नेत्यांनी राज्यात तातडीने राबवा, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, मंत्री, नेते यांची बैठक त्यांनी आयोजित केली होती. आपली संघटना चांगले काम करते; पण पवारांना संघाचे काम चिवटपणे चाललेले दिसते. खरेतर तेच कितीतरी वर्षे सत्तेला चिवटपणे चिटकून आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाशरद पवार