Join us

‘इंडिया’च्या बैठक तयारीचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 06:35 IST

येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीच्या स्थळी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत काँग्रेसचे अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड,   शिवसेना  युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार  संजय राऊत,  शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.

२६ पेक्षा जास्त विचारांचे पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि  शिवसेना अशा महविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते. आम्ही एकत्र काम केले. जो प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी झाला तो देशातही यशस्वी होईल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :इंडिया आघाडीउद्धव ठाकरेशरद पवारमुंबई