Join us  

Sharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 1:20 PM

Sharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

Sharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेलतर आम्हाला याचा आनंदच आहे, असं मत व्यक्त केलं आहे. (Sharad Pawar reaction on Sanjay Raut statement about Uddhav Thackeray should lead country)

'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा

राज्यातील पूरपरिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती दिली. यासोबत पूरग्रस्त भागात २५० डॉक्टरांचं पथक रवाना करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. पण राज्यावरील संकट पाहता मुख्यमंत्र्यानी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे देशाला उत्तम नेतृत्व देतील, असं ते म्हणाले. पवारांना यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. 

"आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आम्हाला याचा आनंदच आहे", असं शरद पवार म्हणाले. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं राऊत म्हणाले होते. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

 

टॅग्स :शरद पवारसंजय राऊतउद्धव ठाकरेचिपळूणला महापुराचा वेढामहाराष्ट्र