तुतारीसोबत पिपाणी नको; शरद पवार गटाची विनंती, यादीतून चिन्ह वगळा अन्यथा कोर्टात जाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 05:43 IST2024-06-25T05:42:48+5:302024-06-25T05:43:08+5:30

सातारासह काही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा पक्षाने केला आहे.

Sharad Pawar group's request, remove the pipani symbol from the list or go to court | तुतारीसोबत पिपाणी नको; शरद पवार गटाची विनंती, यादीतून चिन्ह वगळा अन्यथा कोर्टात जाऊ

तुतारीसोबत पिपाणी नको; शरद पवार गटाची विनंती, यादीतून चिन्ह वगळा अन्यथा कोर्टात जाऊ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शरद पवार गटाचे तुतारी आणि अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हातील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फटका बसल्यानंतर पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. विधानसभेला खुल्या चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळावे, अशी मागणी शरद पवार गटाने आयोगाला पत्राद्वारे केली आहे.  

सातारासह काही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा पक्षाने केला आहे. सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांचा ३२,७७२ मतांनी पराभव झाला. तेथे पिपाणी चिन्हाला ३७,०६२ मते पडली आहेत. दिंडोरीत भास्कर भगरे यांनी भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा १,१३,१९९ मतांनी पराभव केला. इथे पिपाणीला तब्बल  १,०३,६३२ मते मिळाली होती. लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Sharad Pawar group's request, remove the pipani symbol from the list or go to court