शरद कळसकर, अंदुरेच्या चौकशीतून मिळाले धागेदोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:17 AM2019-05-26T04:17:45+5:302019-05-26T04:18:18+5:30

नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना एटीएसने अटक केली होती.

Sharad Kalaskar, got arrested from Indre's inquiry | शरद कळसकर, अंदुरेच्या चौकशीतून मिळाले धागेदोरे

शरद कळसकर, अंदुरेच्या चौकशीतून मिळाले धागेदोरे

Next

मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना एटीएसने अटक केली होती. चौकशीत या दोघांनी नरेंद्र दाभोलकर हत्येबाबतची बरीच माहिती उघड केली. त्यातून धागेदोरे मिळाल्यानंतर सीबीआयने सताननचे वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुनाळेकर व भावे याने दाभोलकरांची व कर्नाटकच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल मुंबईच्या खाडी पुलावरून टाकून नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचे सीबीआयला कळसकर व अंदुरे यांनी चौकशीदरम्यान सांगितले, असे सीबीआयने जानेवारीत पुणे न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे.
आरोपपत्रानुसार, कळसकर आणि अंदुरे हे जून २०१८ मध्ये पुनाळेकर यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात गेले होते. तिथे विक्रम भावेही उपस्थित होता. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी या दोघांकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल होते. पुण्याहून नालासोपारा येथे वैभव राऊत याच्या घरी परतताना खाडी पुलावरून देशी बनावटीचे पिस्तूल पाण्यात टाकले. हे दोघेही पुण्यावरून नालासोपाऱ्याला राऊतच्या बाईकरून आले, असेही
सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले आहे.
दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात ते मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना आधीच अटक केली आहे.
>सनातनकडून निषेध
संजीव पुनाळेकरला सीबीआयकडून झालेल्या अटकेचा सनातन संस्थेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे. केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना अधिवक्ता पुनाळेकर आणि भावे यांना अटक होणे, यामागे षड्यंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोट प्रकरणी भगव्या दहशतवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
>कोण आहे विक्रम भावे?
विक्रम भावेला २००८ मध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतन बॉम्बस्फोटाप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मात्र, सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे. भावेने पुनाळेकरला त्याच्या वकिली व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. जेव्हा पुनाळेकरने शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला कळसकर आणि अंदुरेला दिला, त्या वेळी भावे तेथे उपस्थित होता. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याचे कामकाजही पुनाळेकर सांभाळत होता. त्यामध्ये तो आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर हिची बाजू न्यायालयात मांडत होता. त्यानंतर या प्रकरणी ज्येष्ठ वकिलांची वर्णी लागली. दाभोलकर प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचीही बाजू पुनाळेकर याने न्यायालयात मांडली आहे. तसेच कळसकर आणि अंदुरे यांचीही बाजू न्यायालयात मांडली आहे.
२००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी रुद्र पाटील आणि सारंग अकोलकर यांना आश्रय दिल्याचे पुनाळेकर याने २० जून २०१६ रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले होते. या वेळी त्यांनी आपला भारतीय न्यायसंस्थेवर विश्वास नसल्याची वल्गना केली होती.

Web Title: Sharad Kalaskar, got arrested from Indre's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.