Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहीद मेजर कौस्तुभ राणेंवर उद्या अंत्यसंस्कार, पार्थिव आज मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 18:04 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर गुरुवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठाणे : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर गुरुवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव 6 ते 9 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवाद्यांशी दोनहात करताना महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. त्यानंतर, मेजर राणे यांचे पार्थिव श्रीनगरवरुन आज दुपारी विमानाने दिल्लीला पोहोचले आहे. तर, दिल्लीहून ते पार्थिव मुंबईला येईल. मुंबई एअरपेार्टवरुन मालाड येथील शवगृहात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. त्यांतर गुरुवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी परिवार आणि नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर, सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी मीरा रोड येथील स्मशानभूमीत आणले जाईल.

टॅग्स :शहीदसैनिकजम्मू-काश्मीरदहशतवादी