मेहुणीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:39 AM2018-10-31T00:39:57+5:302018-10-31T00:40:13+5:30

मेहुणीच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी उदय पाल (४७) याला अटक केली आहे.

Sexual harassment on sister's sister | मेहुणीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

मेहुणीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Next

मुंबई : मेहुणीच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी उदय पाल (४७) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ब्रीच कॅन्डी येथील एका इमारतीत पाल जेवण बनविण्याचे काम करतो. येथेच महिनाभरापूर्वी पश्चिम बंगाल येथून त्याच्या मेहुणीची १७ वर्षीय मुलगी नोकरीला आली. त्याची तिच्यावर वाईट नजर पडली. २७ आॅक्टोबरला घरातील मंडळी परदेशात गेली होती. घरातील कामे उरकल्यानंतर मुलगी आंघोळीला गेली. त्याच दरम्यान पाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला रक्तस्त्राव झाल्याने पाल घाबरला. त्याने तिला घेऊन खासगी रुग्णालय गाठले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येताच, डॉक्टरांनी याबाबत गावदेवी पोलिसांना कळविले. गावदेवी पोलिसांनी मुलीकडे याबाबत विचारणा करताच, पोलिसांनी पाल याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sexual harassment on sister's sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.