Join us

वडील, भावाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार; मालाडमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:15 IST

वडील आणि सख्ख्या भावाकडून आपल्यावर व मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार होत असल्याबाबतची तक्रार एका तरुणीने मालाड पोलिसांत दाखल केली आहे.

मुंबई : वडील आणि सख्ख्या भावाकडून आपल्यावर व मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार होत असल्याबाबतची तक्रार एका तरुणीने मालाड पोलिसांत दाखल केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून हे कृत्य होत असून, गुन्हा दाखल केल्यानंतर नराधम पित्याचा व भावाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.वर्षा (नावात बदल) ही १८ वर्षीय तरुणी मालाड परिसरात राहते. मंगळवारी मालाड पोलीस ठाण्यात तिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील व मोठा भाऊ हा ती अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. त्यांच्या या कृत्याला काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या तिच्या आईचीही संमती होती. त्याचप्रमाणे मोठी विवाहित बहीण सुमन (नावात बदल) हिला घरी बोलावून तिच्यावर भाऊ बलात्कार करतो, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने दावा फेटाळून लावल्याचे पीडितेच्या वकिलाने सांगितले. दरम्यान, वर्षाच्या वडिलांनी त्यांच्या लहान मुलाच्या पत्नीवरही अत्याचार केला असून, त्याबाबत तिने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे जबाबात म्हटले आहे. या प्रकरणातील बाप-लेकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :विनयभंग